म्हणे शरद पवारांची चौकशी करा!
आता पत्राचाळ प्रकरणी शरद पवार यांची चौकशी करा अशी मागणी भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर करत आहेत तेही अशा वेळी की मेमन प्रकरणी फडणवीस, शेलार,कोश्यारी आणि खुद्द मोदी यांचे पुरावे सादर केल्यानंतर! आजपर्यंतचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा भाजपा राजकीय दृष्ट्या अडचणीत आला तेव्हा तेव्हा असेच हवेत आरोप करुन जनतेला विचलित करायचं! हा त्यातीलच प्रकार आहे.असे आरोप करणारांची फौज भाजपने तयार केली आहे! पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की दुसर्यांचे तोंड काळे करण्यापूर्वी स्वतः चे हात काळे करावे लागतात तेही पहिल्यांदा!
पार्टी वुईथ डिफरन्स या फक्त वल्गना राहिल्या असून भ्रष्ट जनता पार्टी असे नामांतर भाजपाने करून घेतले आहे.आजचा भाजपा हा पक्ष अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचा राहिला नसून तो एक सत्तापिपासू पक्ष बनला आहे!
आमचे आर आर पाटील आबा नेहमी म्हणायचे भ्रष्ट आणि गुंडांचे शेवटचे आश्रयस्थान म्हणजे राजकारण! हे भाजपाच्या बाबतीत तंतोतंत जुळते आहे. शरद पवार यांच्यावर पत्राचाळ प्रकरणी आरोप झाल्याबरोबर साहेबांनी ताबडतोब चौकशी करा असे आव्हान भाजपाच्या नेत्यांना दिले आहे, आता भाजपाचे नेते आरोप करणे बंद करतील आणि मेमन प्रकरणही शांत झाले आहे.
आजपर्यंतचा भाजपाचा इतिहास तपासला तर हेच स्पष्ट होते.निष्पन्न कांहीच करायचे नसते पण आरोपांची राळ उडवून द्यायची आणि संशयकल्लोळ निर्माण करायचा आणि सत्तेचे मनसुबे पुर्ण करायचे, हे गलिच्छ राजकारण भाजपाचे नेते खेळत आहेत. शरद पवार यांनी जाहीर केलेली एका गोष्टीचे स्वागत करायला हवे.केलेले चुकीचे असतील तर आरोप करणार्यांवर काय कारवाई करणार?कर नाही त्याला डर कशाची? पण हे आव्हान भाजपाचे नेते स्विकारणार नाहीत!ती मर्दुमकी त्यांच्याकडे नाही.
आज गरज आहे ती ईडीकडे जेवढ्या फाईल्स आहेत आणि त्यापैकी जे नेते भाजपवासी झाले आहेत त्यांच्या बाबतीत ईडीची भुमिका संशयास्पद आहे त्याची चौकशी होण्याची? सर्व पक्षीय नेत्यांनी ईडी कार्यालयासमोर निदर्शने केली पाहिजेत.उलट किरीट सोमय्या यांचीच चौकशी व्हायला हवी.ते काय ईडीचे प्रवक्ते आहेत काय?ईडी ही स्वायत्त संस्था असेल तर कारवाई करण्यापूर्वी त्यांना माहिती कशी मिळते? याबाबतीत खा.सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत आवाज उठवला होता.आता ईडीच्याच कारभाराची चौकशी करण्याची मागणी करायला हवी.शरद पवार यांची बदनामी म्हणजे वीतभर लाकूड आणि हातभार ढलपी! आता राजकारणाचा धंदा झाला आहे त्या वाईट प्रवृत्ती मोडून काढावी लागतील! महाराष्ट्र सरकार हा माझ्या लिखाणाचा स्वतंत्र विषय आहे परंतु ज्यांना महाराष्ट्र कळला नाही त्यांना शरद पवार काय कळणार? शरद पवार आणि त्यांचं राजकारण समजून घ्यायला त्याला किमान त्यांच्या वयाइतके जगायला लागतं, तेव्हा कुठंतरी थांग लागेल!
महादेव माळी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.