एकनाथ शिंदेंना संघटना, चिन्ह चालते मग शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आणि नातू का चालत नाही?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खालच्या पातळीवर जाऊन असंस्कृत राजकारण करीत आहेत. त्यांना शिवसेनाप्रमुखांचे नाव चालते, संघटना, चिन्ह चालते, तर मग त्यांचा मुलगा आणि नातू का चालत नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आमदार निलेश लंके यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांना आपले उत्तराधिकारी म्हणून नेमले. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत दहा वर्षे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळली. असे असताना त्यांच्याकडून पक्ष संघटना, संघटनेचे नाव, शिवसेनाप्रमुखांचे नाव, पक्षचिन्ह ओरबाडण्याचा प्रयत्न करणे हे एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटाच्या असंस्कृतपणाचे लक्षण आहे. संविधानाशी फारकत घेऊन ते वागत आहेत.
इतर पक्षांतून भाजपात गेलेले 'आम्ही आता चिंतामुक्त झालो असून, आता निवांत झोप येते' असे सांगत आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांची भाजप आता राहिलेली नाही. आता संविधान पायदळी तुडवून आम्ही म्हणतो तेच खरे असे म्हणणाऱया लोकांची भारतीय जनता लाँड्री अस्तित्वात आल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.