शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 22 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत असून ही योजना बँकेमार्फत आहे. देशांतर्गत व परदेशात उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणारे इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी यासाठी पात्र राहतील. या योजनेत संपूर्ण कर्ज संबंधित बँकेचे राहणार असून विद्यार्थ्यांने बँकेच्या कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास कमाल 12 टक्के पर्यंतची व्याज परतावा रक्कम दर महिन्याला महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करेल. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनीं केले आहे.
ही योजना ऑनलाईन स्वरूपाची असून त्यासाठी संबंधितांनी महामंडळाची वेबसाईट www.msobcfdc.org उघडावी व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना हा पर्याय निवडावा. पोर्टलवर कर्ज मागणी अर्ज भरावा. संबंधित मूळ कागदपत्रे अपलोड करावीत व प्रस्ताव ऑनलाईन दाखल करावा. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या 0233-2321513 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. बिरादार यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.