Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी यापूर्वीच्या बंदी आदेशात बदल

पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी यापूर्वीच्या बंदी आदेशात बदल


सांगली, दि. 22,  : जिल्ह्यात उद्भवलेल्या गो व महिष वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने दि. 8 सप्टेंबर 2022 रोजी बंदी आदेश पारित करण्यात आला आहे. या आदेशामध्ये जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी खालीलप्रमाणे बदल करून दुरूस्ती आदेश आज पारित केला आहे.

या आदेशानुसार शेतकरी / गोपालक यांना बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून गाय वर्गीय व महिष (म्हैस) वर्गीय जनावरांच्या खरेदी करणे व वाहतूक करण्यास मनाई केली आहे. सांगली जिल्ह्याबरोबरच लगतच्या जिल्ह्यांमध्येही लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्याने जिल्ह्यातील गाय व महिष (म्हैस) वर्गीय जनावरांचे आठवडी बाजार भरविण्यास मनाई केली आहे. तसेच जिल्ह्यातील इतर आठवडी बाजारांमध्येही गाय व महिष (म्हैस) वर्गीय जनावरांची खरेदी-विक्री व प्रदर्शन होत असल्यास त्यालाही मनाई केली आहे. तसेच गाय व महिष (म्हैस) वर्गीय जनावरांच्या शर्यतीचे आयोजन करण्यास सक्त मनाई केली आहे. 

हा आदेश गाय व महिष (म्हैस) वर्गीय जनावरांव्यतिरिक्त इतर जनावरांच्या बाबतीत लागू राहणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करावी. हा आदेश पारित झाल्यापासून ते दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.