Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधींच्या नकारानंतर अशोक गेहलोत निवडणुकीच्या रिंगणात

राहुल गांधींच्या नकारानंतर अशोक गेहलोत निवडणुकीच्या रिंगणात


काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक  जसजशी जवळ येत आहे, तसतसे सारे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाच्या दावेदारीवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. मात्र, हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वत: या निर्णयाची घोषणा केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता गेहलोत हे अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अशोक गेहलोत  हे आत्तापर्यंत राहुल गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे उत्तर देत होते. मात्र, काल (22 सप्टेंबर) गेहलोत हे राहुल गांधींसोबत केरळमध्ये भारत जोडो यात्रेत सामील झाले. यादरम्यान राहुल गांधींचे मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, राहुल गांधी यांनी निवडणूक लढवण्या स्पष्ट नकार दिला. त्यानंतर गेहलोत यांनी आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळं आता सस्पेन्स संपला आहे.

गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार

निवडणूक लढवण्याच्या घोषणेसोबतच अशोक गेहलोत यांनीही आपण राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एक व्यक्ती एक पद यानुसार मी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केलं आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबतचा निर्णय सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी ठरवतील असेही ते म्हणाले. त्यामुळं आता अशोक गेहलोत हे काँग्रसचे अध्यक्ष बनणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अशोक गेहलोत यांच्याबरोबर 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा

अशोक गेहलोत यांच्याशिवाय शशी थरुर, मनीष तिवारी तसेच अन्य काही नेतेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, गेहलोत यांना सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत. अशोक गेहलोत 24 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. त्यानंतर 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला अध्यक्षपदाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.