Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोटात चार कॅप्सूल, त्यात १ किलो सोनं

पोटात चार कॅप्सूल, त्यात १ किलो सोनं


मुंबई: दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला केरळमधील करीपूर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. हा प्रवासी मलप्पुरम जिल्ह्यातील वरियामकोडचा रहिवासी आहे. नौफल असं त्याचं नाव आहे. नौफल सोमवारी दुबईहून करीपूर विमानतळावर पोहोचला. त्याच्या पोटात चार कॅप्सूल आढळून आल्या. त्यामध्ये १ किलोहून अधिक सोनं होतं. सोनं तस्करी प्रकरणात नौफलला अटक करण्यात आली आहे. 

नौफलनं आणलेल्या सामानाची पोलिसांनी तपासणी केली. त्याच्या पोटातून सोनं काढण्यासाठी त्याला कोंडोट्टी येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्या पोटाचा एक्स रे काढण्यात आला. त्याच्या पोटात चार कॅप्सुल आढळून आल्या. गेल्या काही महिन्यांतील करीपूर विमानतळावरील सोने तस्करीची ही ५९ वी घटना आहे. याआधी जयपूर विमानतळावर १ किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. त्याची किंमत जवळपास ५५ लाख रुपये होती. तीन तस्कर शारजहावरून सोनं घेऊन आले होते. पैकी दोघांना विमानतळावरच अटक करण्यात आली. तर तिसऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानं सोन्याचे चार बॉल गिळले होते. डॉक्टरांनी ते शस्त्रक्रिया करून बाहेर काढले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.