Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार संतोष बांगर हल्ला प्रकरण : अंजनगाव सुर्जी पोलिसांची मोठी कारवाई! ११ शिवसैनिकांना घेतलं ताब्यात.....

आमदार संतोष बांगर हल्ला प्रकरण : अंजनगाव सुर्जी पोलिसांची मोठी कारवाई! ११ शिवसैनिकांना घेतलं ताब्यात.....


आमदार संतोष बांगर हल्ला प्रकरण : अंजनगाव सुर्जी पोलिसांची मोठी कारवाई! ११ शिवसैनिकांना घेतलं ताब्यात; म्हणाले, “अटकसत्र…” पोलिसांनीच दिली यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये अगदी शेवटच्या क्षणी दाखल झालेले आमदार म्हणून ओळख असणाऱ्या संतोष बांगर यांच्या ताफ्यावर रविवारी सायंकाळी अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी केलेल्या हल्ला प्रकरणात ११ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनीच दिली आहे. या प्रकरणात एकूण १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीमधील या हल्ला प्रकरणामध्ये शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणामध्ये १५-२० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकसत्र सुरु असल्याचं वानखडे यांनी सांगितलं. “काल लाला चौकामध्ये आमदार बांगर आले होते. त्यांच्या कारवर काही लोकांनी हाताने थापा मारला आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आम्ही १५ ते २० शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे,” असं ठाणेदार वानखडे यांनी सांगितलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.