सांगलीच्या आरिफा मुल्ला यांनी पटकावला ग्लॅमन "मिसेस इंडिया पुरस्कार"
थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये सांगली सीआयडीच्या पोलीस उपअधीक्षक सौ. आरिफा मुल्ला या थायलंड येथे झालेल्या ग्लॅमन मिसेस इंडिया च्या विजेत्या ठरल्या. याशिवाय त्या स्पर्धेतील बेस्ट पर्सनॅलिटी च्या उपविजेत्याही ठरल्या.
थायलंड मधील फुकेट येथे मिस इंडिया आणि मिसेस इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ४२ स्पर्धकांची फुकेट येथील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती . १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या. झालेल्या स्पर्धेत सांगली सीआयडी विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सौ. आरिफा मुल्ला या थायलंड येथे झालेल्या " ग्लॅमन मिसेस इंडिया " ठरल्या. मुल्ला यांनी या स्पर्धेची ऑडिशन पुणे येथे दिली होती. फिल्मफेअर मिडल इस्ट च्या ग्लॅमन या कंपनी तर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.