Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच काँग्रेसला गुजरातमध्ये धक्का!

विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच काँग्रेसला गुजरातमध्ये धक्का!


गांधीनगर : अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि कॉंग्रेसच्या 14 आमदारांना गुजरात विधानसभेतून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. गोंधळाच्या वातावरणात या आमदारांना मार्शल करवी सभागृहातून उचलबांगडी करून बाहेर काढण्यात आले. गुजरात विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रकार घडला. 

अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते सुखराम रथवा यांनी आंदोलक सरकारी कर्मचारी, शेतकरी, अंगणवाडी सेविका आणि माजी सैनिकांच्या प्रश्‍नांवर विशेष चर्चेची मागणी केली. सभापती निमाबेन आचार्य यांनी रथवा यांची मागणी नाकारताच मेवाणी आणि कॉंग्रेसचे इतर आमदार सभापतींच्या आसनापुढील मोकळ्या जागेच धावले आणि घोषणाबाजी करू लागले.

सभापतींच्या निर्देशानुसार विरोधी पक्षाच्या आमदारांनी जागेवर जाण्यास नकार दिल्यावर विधीमंडळ व संसदीय कामकाज मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी वेलमध्ये बसलेल्या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. बहुमताच्या जोरावर आचार्य यांनी मेवाणी आणि इतर 14 कॉंग्रेस आमदारांना दिवसभरासाठी निलंबित केले.  निलंबित केल्यानंतरही आमदारांनी सभागृह सोडण्यास नकार दिल्याने सभापतींनी मार्शल बोलावून त्यांची उचलबांगडी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.