ध.श्री. दिलीप शामराव आरवाडे रा. सांगली यांच्याकडून श्रीमतीबाई कळंत्रे जैन श्राविकाश्रमास 3 लाख 35 हजाराचे बृहत्दान
मार्केट यार्ड सांगली येथील प्रसिध्द ‘मे. शामराव तात्यासोा आरवाडे' या अडत फर्मचे व्यापारी ध.श्री. दिलीप शामराव आरवाडे यांनी आपल्या मातोश्री स्व. श्रीमती निर्मला शामराव आरवाडे यांच्या स्मरणार्थ दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली येथील श्रीमतीबाई कळंत्रे जैन श्राविकाश्रमास सौर वीजनिर्मिती (सोलर एनर्जी) करीता रुपये 3 लाख 35 हजारचे बृहत्दान दिले.
दि.21 सप्टेंबर रोजी श्री. दिलीप आरवाडे यांनी सभेच्या कार्यालयात सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्याकडे देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी श्राविकाश्रमच्या चेअरमन अनिता पाटील, सुपरिटेंडेंट वीना आरवाडे, प्राचार्य रमेश चराटे आदी मान्यवर उपस्थित होते. देणगीबद्दल श्री. दिलीप शामराव आरवाडे यांचा कृतज्ञतापूर्वक त्यांचा सन्मान केला.
स्व. श्रीमती निर्मला आरवाडे या कळंत्रे जैन श्राविकाश्रम या शाखेच्या सन 1988 ते 1997 अखेर सदस्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या गव्हर्निंग व मॅनेजिंग कमिटीच्या सदस्या म्हणूनही कार्य केले आहे. लठ्ठे संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर सदस्य म्हणून कार्यरत होत्या.
वडील श्री. शामराव तात्यासोा आरवाडे हेही दक्षिण भारत जैन सभेचे व्हा. चेअरमन म्हणून सन 1985-86 मध्ये योगदान दिले आहेत. दक्षिण भारत जैन सभा व लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमध्ये उभयतांनी सेवायोगदान दिले आहे.
या बृहद्दानामध्ये ध.श्री. दिलीप शामराव आरवाडे व कुटुंबीयांचे दक्षिण भारत जैन सभा परिवार व श्रीमतीबाई कळंत्रे जैन श्राविकाश्रमतर्फे मन:पूर्वक आभार.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.