...तर 2024 ला देशात भाजपचा पराभव अटळ...
माजी खासदार आणि अर्थतज्ज्ञ म्हणाले...
2024 च्या निवडणुकीत बिगर भाजप पक्ष एकत्रित झाले आणि पंतप्रधान कोण होणार यासाठी वाद न घालता सर्व पक्ष एकत्र झाले तर भाजपचा पराभव अटळ आहे. यात प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे आहेत. भारत जोडो अभियानाला देशात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळु सरकत आहे. कोकणात होणाऱ्या रिफायनरीला काँग्रेसचं समर्थन असल्याचं अनुमोदनच माजी खासदार आणि अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कुडाळमध्ये पत्रकारांशी बोलताना केलं.
"...तर उपाशी मरण्याची वेळ येईल"
केंद्रीय पर्यावरण समितीचे माजी चेअरमन यांनी आता तंत्रज्ञान अद्यावत झालं असून अशा प्रकारच्या प्रकल्पातुन जे नुकसान होते ते कमीत कमी होऊ शकेल. अशाप्रकारे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. पर्यावरण आणि विकास यांचा समतोल साधून रिफायनरी सारखे प्रकल्प व्हावेत असं सांगत असतानाच मुंबईतील रिफायनरीचं उदाहरण सुद्धा त्यांनी दिलं. मात्र स्थानिकांचा विरोध असल्यास त्यांचं प्रबोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. विकासा शिवाय पर्यावरण घेऊन बसलो तर उपाशी मरण्याची वेळ येईल.
''काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवड लोकशाही पद्धतीने होणार''
17 ऑक्टोबरला होणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीत गांधी घराणे नसेल असं गांधी घराण्याने स्पष्ट केला आहे. गांधी घराण्याने देशाला फार मोठ्या वैभवाकडे नेण्याचं काम केलं आहे. भाजप आणि मोदी सरकारचे गांधी घराण्याला शत्रू मानून त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहेत. देशाचं आणि काँग्रेसचं खच्चीकरण करण्याचं काम भाजप करत आहे. त्यात ते यशस्वी होणार नाहीत. काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवड लोकशाही पद्धतीने होईल.
"चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव द्या"
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव द्यावे. कोकणचे सुपुत्र, घटनातज्ञ, संसदपटू, स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते असणारे नाथ पै यांच्या किर्तीवान नेतृत्वाला आणि किर्तीला सुसंगत अशा प्रकारे कायमच स्मारक म्हणून चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करावे अशी मागणी भालचंद्र मुणगेकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई वाहतूक मंत्री जोतीरादित्य सिंधीया यांच्याकडे केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.