महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी १९७१ मध्ये शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सांगलीत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची स्थापना केली होती.. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या या महामंडळाच्या खासदार सुप्रियाताई सुळे अध्यक्षा आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात सांगलीत महामंडळाचे भव्य अधिवेशन होणार आहे.
या अधिवेशनाची माहिती व शिक्षण संस्थासमोरील महत्वाच्या समस्यांची माहिती देण्यासाठी बुधवार दि. २७ जुलै २०२२ रोजी दु. ४.००वा.कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था (सांगली कोल्हापूर रोड एसटी स्टँड जवळ) सांगली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात , सरकार्यवाह माजी आमदार विजय गव्हाणे व खजिनदार श्री रावसाहेब पाटील हे उपस्थित राहणार आहेत. कृपया आपला प्रतिनिधी पाठवून द्यावा ही विनंती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.