जूनमध्ये वाढेल DA, महाराष्ट्र सरकारने केले कन्फर्म, पगारात होईल 40,000 रूपयांची वाढ
नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोग अंतर्गत महाराष्ट्र सरकारने महागाई भत्त्यात वाढीची घोषणा केली आहे. अपेक्षा आहे की, लवकरच डीएचा हप्ता भरला जाईल. महाराष्ट्र सरकारच्या कर्मचार्यांना आता 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. तो लवकर वाढवून 34 टक्के केला जाऊ शकतो. 'मनी कंट्रोल'ने हे वृत्त दिले आहे.
केंद्र सरकारनंतर अनेक राज्यांनी आपल्या कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. केंद्र सरकार आपल्या कर्मचार्यांना आता 34 टक्के दराने महागाई भत्ता देत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महाराष्ट्र सरकारने घोषणा केली आहे की, सातव्या वेतन आयोग अंतर्गत हप्त्यांद्वारे महागाई भत्ता वाढवला जाईल.
असे केले जाईल डीए पेमेंट
महाराष्ट्र सरकारच्या कर्मचार्यांसह जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या कर्मचार्यांना 2019 मध्ये 7 व्या वेतन आयोग अंतर्गत आणण्यात आले होते. यानंतर सरकारने निर्णय घेतला की, 2019-20 पासून सुरू होऊन, कर्मचार्यांना पाच हप्त्यांमध्ये पाच इन्स्टॉलमेंटमध्ये पाच वर्षापर्यंत दिला जाईल.
इतक मिळाले आहेत हप्ते
राज्याच्या कर्मचार्यांना आतापर्यंत दोन हप्ते मिळाले आहेत. जूनमध्ये राज्य सरकार कर्मचार्यांना आता तिसर्या हप्त्याचे पेमेंट होणार आहे. यानंतर पुढील येणार्या वर्षात चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पेमेंट केले जाईल.
40 हजार रूपयांपर्यंत वाढेल पगार
सरकारच्या या निर्णयाने सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचार्यांमध्ये ग्रुप ए च्या अधिकार्यांच्या भरपाईत वाढ होईल. जवळपास 30,000 रूपयांपासून 40,000 रुपये एकाच वेळी वाढतील. ग्रुप बी च्या अधिकार्यांना 20,000 रूपयांपासून 30,000 रूपयांचा बोनस मिळेल. ग्रुप सी च्या अधिकार्यांना 10,000 रूपयांपर्यंत मिळेल. महाराष्ट्रात सरकारी कर्मचार्यांचा डीए आता 31 झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.