पाटबंधारे विभागात मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष सुरू
सांगली, दि. 2, : सांगली पाटबंधारे विभाग, सांगली येथे दि. 1 जून 2022 पासून मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष 2022 स्थापन झाला आहे. या अंतर्गत कृष्णा उपखोऱ्यातील माहिती एकत्रित करून प्रशासन, प्रसार माध्यमे यांना संबंधित यंत्रणामार्फत उपलब्ध करून दिली जाते. पूर नियंत्रण कक्ष अधिकारी म्हणून सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2301820/2302925, फॅक्स क्रमांक 0233-2302750, मोबाईल क्रमांक 9307862396 असा आहे. हा पूरनियंत्रण कक्ष दि. 1 जून ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अखंडित कार्यरत ठेवण्यात येणार असून अधिक माहितीसाठी पूरनियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती देवकर यांनी केले आहे.
या पूर नियंत्रण कक्षाचे उद्घाटन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता ता. रा. काळे, सहाय्यक अभियंता मो. रा. गळंगे, सहाय्यक अभियंता वि. वि. मुंजाप्पा, समन्वय अधिकारी श्वेता दबडे व पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.