महापालिकेचा निधी पळवण्यासाठी नगरसेवकांत चढाओढ
मिरजेतील नगरसेवक अधिक आक्रमक, निवडणुकीच्या तोंडावर हालचाली गतीमान
सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली महापालिकेला सुमारे १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच हा निधी महापालिकेला प्राप्त होणार आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या निधीवर अनेक नगरसेवकांचा डोळा आहे. हा निधी आपल्या वॅडर्मध्ये नेण्यासाठी नगरसेवकांत चढाओढ सुरू झाली आहे. यातील बहुतांश निधी मिरजेला नेण्यासाठी तेथील नगरसेवकांनी आतापासूनच फिल्डींग लावल्याची चर्चा आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त, नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी सांगली दौऱ्यावर आल्यानंतर महापालिकेला १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे गेल्या साडेतीन वषार्त वॉर्ड मध्ये विकासकामे न केलेले नगरसेवक आता झाडून जागे झाले आहेत. यातील निधी घेऊन वॉर्ड मध्ये विकासकामे करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. त्यामुळे हा निधी लवकरात लवकर आणून तो आपल्या वॉर्ड मध्ये नेण्यासाठी आतापासूनच नगरसेवकांची चढाओढ सुरू झाली आहे. या निधीबाबत सांगलीतील नगरसेवकांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. मात्र मिरजेच्या नगरसेवकांनी आतापासूनच निधीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मिरजेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडची उठबस वाढवली आहे. आपल्याच प्रभागात जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी आतापासून प्रयत्न केले जात आहेत. महापालिका क्षेत्रात सवार्धिक खराब रस्ते मिरज शहरात आहेत. निवडणुकीला सामोरे जाण्या पूर्वी रस्ते, गटारी, स्ट्रीटलाईट, ड्रेनेज आदी कामे करण्यासाठी आता नगरसेवक सक्रीय झाले आहेत. त्यासाठी त्यांना निधीची गरज आहे. म्हणूनच मिरजेतील नगरसेवकांचा उपमुख्यमंत्र्यांकडून मिळणाऱ्या निधीवर डोळा असल्याची चर्चा महापालिका वतुर्ळात रंगली आहे.
त्यातच महापालिकेचे विद्यमान महापौर राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे आता महापौरांच्या अंटी चेंबरमध्ये आता नगरसेवकांच्या बैठका मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. शिवाय राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांकडेही नगरसेवकांच्या फेऱ्या वाढल्याचीही चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.