गायक केके यांच्या कपाळावर आणि ओठांवर जखमेच्या खुणा, गुन्हा दाखल
कोलकाता : गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताज्या माहितीनुसार, केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत, त्याबाबत पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. केके यांचे पोस्टमॉर्टम कोलकाता रुग्णालयात होणार आहे. त्याचबरोबर केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा मिळाल्यानंतर आता पोलीस हॉटेल कर्मचारी आणि आयोजकांची चौकशी करू शकतात.
गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस केके यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. त्यांच्या संमतीनंतर आणि मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया, चौकशी आणि पोस्टमॉर्टम केले जाईल. एसएसकेएम रुग्णालयात शवविच्छेदनाची व्यवस्था करण्यात येत आहे. दुपारनंतर मृतदेह केके यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे. पोलीस सध्या पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालाची वाट पाहत आहेत.
प्रसिद्ध गायक केके (कृष्णकुमार कुननाथ) यांचे निधन झाले. केके पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होते, त्यानंतर त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती मिळाली होती. केके यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. बॉलिवूड सेलेब्रिटींपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.
केके यांच्या निधनानंतर गायिका श्रेया घोषाल भावूक झाली आणि म्हणाली की, मला धक्का बसला आहे. केके आता आपल्यात नाहीत हे स्वीकारणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. यावेळी त्याच्या कुटुंबाला किती वेदना होत असतील याची मी कल्पनाही करू शकत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.