१०वी उत्तीर्णांना पोस्ट विभागात नोकरीची संधी, 38926 रिक्त जागा, अर्ज करण्याचे काहीच दिवस शिल्लक.
सध्या देशात अनेक लोक बेरोजगार आहेत. अशात एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. इंडिया पोस्टमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगलीच संधी आली आहे. या भरतीसाठी एकूण ३८९२६ रिक्त पदे काढण्यात आली आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 2 मे 2022 पासून सुरू होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट appost.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 02 मे 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जून 2022
रिक्त जागा तपशील
एकूण पदे - ३८,९२६
पात्रता निकष
पोस्ट विभागातील ग्रामीण डाक सेवक पदांसाठी, उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा तसेच अर्जाच्या पोस्टल सर्कलसाठी विहित केलेल्या प्रादेशिक भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्या भाषेत लिहिता, वाचता आणि बोलता आले पाहिजे.
वय श्रेणी
किमान वयोमर्यादा - 18 वर्षे
कमाल वयोमर्यादा - 40 वर्षे
पगार
बीपीएम - 12,000 रु
एबीपीएम/डाक सेवक - रु. 10,000
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीद्वारे केली जाईल. इतर कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.
अर्ज फी
सर्व सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये भरावे लागतील तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क निश्चित केलेले नाही.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्रणालीद्वारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.