मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात, सामाजिक सलोखा राहावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन...
सांगली दि. २७ मे २०२२: समाजात शांतता राहावी, सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने आज सांगली जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, काही विघ्नसंतोषी हिसंक प्रवृत्तीचे लोक मशिदीवरील भोंगे,हनुमान चालीसा,मंदिर- मशिद वरून समाजात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत देशात सर्व जातीचे व धर्माची लोक बंधुता टिकवून आनंदाने राहात असताना काही जातीयवादी राजकीय पक्ष, संघटना जाती धर्माचा नावाने दंगली निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा डाव आखत आहेत.
अस्थिरता निर्माण करत सामाजिक परिस्थिती बिघडू पाहत आहेत अश्या लोकांवर तातडीने कारवाई करा व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, जिल्हासंघटक संजय कांबळे, अनिल मोरे, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ मिरज तालुकाध्यक्ष मोहसीनखान मुल्ला तसेच मिरज शहर अध्यक्ष आसलम मुल्ला, जाफर बेग, इ.हनीफअल्लाबक्ष मुल्ला, इ.युनूस बेग,इ.जाफर बेग, असिफ जमादार, यांच्या बरोबर मुस्लीम समाजातील शिक्षित वर्ग मोठ्या संख्याने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.