Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती विविध विभागांकडील योजनांच्या कामाचा घेणार आढावा

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती विविध विभागांकडील योजनांच्या कामाचा घेणार आढावा


                              दि. 1 ते 3 जून कालावधीत सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सांगली दि. 31  : महाराष्ट्र  विधानमंडळ सचिवालय महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ही समिती दि. 1 ते 3 जून 2022 या कालावधीत विविध विभागाअंतर्गत महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या कामाचा आढावा घेणार आहे. 

ही समिती सांगली जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग, नगरविकास विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, सामाजिक न्याय विभाग, सहकार विभाग, गृह विभाग (राज्य उत्पादन शुल्क, पोलीस कारागृह, परिवहन), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, औषधी द्रव्ये विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, महसूल व वन विभाग, ग्रामविकास विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, कृषी व पदुम विभाग, विधी व न्याय विभाग (मनोधैर्य योजनेबाबत), कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी विविध विभागाअंतर्गत महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, प्रकल्प/कामांना केंद्र व राज्य शासन तसेच अन्य वित्तीय संस्था यांच्याकडून करण्यात आलेली आर्थिक तरतूद, प्राप्त झालेला निधी, प्रत्यक्ष झालेला खर्च व कामांच्या सद्यस्थितीबाबत भेट देऊन पाहणी करणार आहे. 

समितीचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि. 31 मे रोजी रात्री शासकीय विश्रामगृह सांगली येथे मुक्काम. बुधवार, दि. 1 जून रोजी सकाळी 9.30 ते 10 वाजेपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत अनौपचारिक चर्चा. सकाळी 10 ते दुपारी 12.45 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह सांगली येथे सर्व संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी 12.45 ते 1.15 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.15 ते 1.30 वाजेपर्यंत समितीची अंतर्गत बैठक - विविध विभागांच्या योजना/प्रकल्प/कामे, कार्यालयांना भेट, पाहणी व बैठकी संदर्भात नियोजन करणे. दुपारी 1.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वरील विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना, प्रकल्प कार्यालये व कामांना भेट व पाहणी. रात्री शासकीय विश्रामगृह सांगली येथे मुक्काम. 

गुरूवार, दि. 2 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वरील विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना, प्रकल्प कार्यालये व कामांना भेट व पाहणी. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वरील विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना, प्रकल्प कार्यालये व कामांना भेट व पाहणी. रात्री शासकीय विश्रामगृह सांगली येथे मुक्काम. 

शुक्रवार, दि. 3 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वरील विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना, प्रकल्प कार्यालये व कामांना भेट व पाहणी. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या योजना/कामे/कार्यालयांना दिलेल्या भेटी व पाहणीच्या वेळी आढळून आलेल्या बाबींच्यासंदर्भात तसेच लेखी माहितीच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.