Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार? ठाकरे सरकार अडचणीत येण्याची शक्यता

 महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार? ठाकरे सरकार अडचणीत येण्याची शक्यता


मुंबई, 29 मे : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी सरकार अडचणीत येणार असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महाविकास आघडीमध्ये काँग्रेस राहणार की जाणार? यासाठी उद्या दिल्लीत फैसला होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलवली आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे, असा आरोप काही काँग्रेस मंत्र्यांचा आहे.

काँग्रेसच्या विषयांबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही, अशी महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कोर्ट लढाईत काँग्रेस एकाकी पडली. राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केली. काँग्रेसचे नगरसेवक फोडले.

आमदार निधीमध्ये भेदभाव केला, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेत्यांची नाराजी टोकाला पोहोचली आहे. त्यामुळेच महाविकास आघडीमध्ये काँग्रेसचे स्थान यावर उद्या दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बोलावण्यात आलेलं नाही, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेना खासदाराचीही नाराजी, महाविकास आघाडीत खरंच धुसफूस? महाविकास आघाडीत सध्याच्या घडीला खरंच धुसफूस आहे की काय, असं चित्र निर्माण झालं आहे. कारण शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतंच एक मोठं विधान केलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्रिसूत्री कार्यक्रम पाळला जात नाही. निधी वाटपाबाबत ठरलेला फॉर्म्युला वापरला जात नाही.

आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसबाबत ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खरंच बिघाडी आहे की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.राज्यसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीबाबत हायकमांडने घेतलेल्या निर्णयावर काँग्रसचे महाराष्ट्रातील नेते नाराज दरम्यान, आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात संघर्ष पाहण्यास मिळाला. पण, आता काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून राज्याबाहेरील व्यक्तीला संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.