सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पावसाळ्यात विजांपासून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता
काय करावे?
* घरी असल्यास शक्यतो बाहेर पडणे टाळा.
* घरात असल्यास दारे व खिडक्या बंद ठेवा.
* घराबाहेर असल्यास सुरक्षित निवाऱ्याठिकाणी प्रस्थान करा.
* वीज पडल्यास, वज्राघात झाल्यास त्वरित रुग्णवाहिका बोलवा.
* वज्राघात झालेल्या व्यक्तीचे श्वसन आणि हृदयाचे ठोके बंद असल्यास वैद्यकीय मदत मिळेपर्यंत कृत्रिमरीत्या (Mouth to Mouth, CPR) सुरू ठेवा.
* लोखंडी वस्तू, अवजारे यांच्यापासून दूर राहा.
काय करू नये?
* घरी असल्यास वायर द्वारे जोडलेल्या उपकरणांना हात लावू नका.
* वादळ, वारे, विजा चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळा.
* काँक्रीटच्या जमिनीचा आश्रय घेऊ नका.
* पाऊस, वार्यापासून आश्रय घेण्यासाठी झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका.
* वाहनांच्या धातू किंवा सुवाहक मार्गाशी संपर्क टाळा.
* अधांतरी असणाऱ्या केबल्सला हात लावू नका. त्यापासून दूर राहा.
सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्वांनी दामिनी ॲप डाऊनलोड करून वापर करा!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.