एनडीआरएफ मार्फत गाव आपत्ती प्रतिसाद दलास एक दिवसीय प्रशिक्षण सोमवारपासून - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली दि. 27 : महापूर या संभाव्य आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सुसज्ज राहण्याकरिता सांगली जिल्ह्यातील एकूण 104 पूरप्रवण गावामध्ये गाव आपत्ती प्रतिसाद दल गठीत करण्यात आलेले आहे. या गाव आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्यांना तालुकानिहाय तालुक्याच्या ठिकाणी एन.डी.आर.एफ. मार्फत एक दिवसीय प्रशिक्षण दि. 30 मे ते 3 जून 2022 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शोध व सुटका, प्रथमोपचार पध्दती, उपलब्ध असलेले साहित्य वापराचे प्रात्यक्षिक, बोट वापराबाबत माहिती इत्यादीचा समावेश असणार आहे. दि. 30 मे रोजी मिरज, 31 मे रोजी महानगरपालिका सांगली, 1 जून रोजी पलूस, 2 जून रोजी वाळवा व 3 जून रोजी शिराळा येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रशिक्षण कार्यक्रम सर्व संबंधित पूरप्रवण गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांना अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.