Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोनात पालक गमावलेल्या बालकांच्या सर्वागिण विकासासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

कोरोनात पालक गमावलेल्या बालकांच्या सर्वागिण विकासासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ‍ यांच्या हस्ते  28 बालकांना विविध योजनांचे प्रमाणपत्र व कीट वाटप


सांगली दि. 30  : कोरोना महामारीवर देशातील जनतेने यशस्वीपणे मात केली. कोरोनाकाळातील परिस्थिती अत्यंत संघर्षमय आव्हानात्मक होती. या परिस्थितीत अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली. यामध्ये अनेक बालकांनी आपले आई वडीलही गमावले. देशातील अशा सर्व बालकांचा शैक्षणिक खर्च शासन करणार आहे. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. त्याचबरोबर शैक्षणिक मदत म्हणून दरमहा 4 हजार रूपये मदत दिली जाईल. पी.एम. केअर फॉर चिल्ड्रन योजनेतून 18 ते 23 वयोगटातील कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना स्टायफंड दिला जाईल. 23 वर्षानतंर विम्याच्या स्वरूपात 10 लाख रूपये दिले जातील. या बालकांना हेल्थ कार्ड व 5 लाखांपर्यंत आरोग्य बाबत उपचार सुविधा दिल्या जातील. कोरोनात पालक गमावल्यामुळे अनाथ बालकांवर फार मोठी आपत्ती ओढवली या बालकांच्या भविष्याचा ‍विचार करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व सर्वागिण विकासासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल.असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.  


जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे PM Care For Children योजनेंतर्गत मुलांना देण्यात येणारा लाभ व सेवा तसेच कोविड 19 मुळे अनाथ झालेल्या बालकांचे सर्वोत्कृष्ट हित बालकास 23 वर्षे होईपर्यंत संरक्षित करणेबाबत व्हर्चुअल मोडद्वारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संबोधीत केले व लाभार्थी बालकांना विविध योजनांचे कागदपत्रे व कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी सुवर्णा पवार, बाल कल्याण समिती सदस्य, तसेच पालक गमावलेली अनाथ बालके व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, कोरोनाकाळात देशात मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला. यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरलो. संकट काळात देशातील जनतेने दिलेली बहुमोल साथ व  महामारीवर केलेली मात यासाठी मी देशातील जनतेला प्रणाम करतो.  देशाच्या सर्वागिण विकासासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यांचा जनतेने लाभ घ्यावा. कोरोनामुळे एक बाब स्पष्टपणे लक्षात आली. कठीणातला कठीण काळ निघून जातो. पण त्यानतंर निर्माण झालेली परिस्थिती सावरण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून एकजुटीने काम केले पाहिजे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या चर्तुसुत्रीच्या मंत्राप्रमाणे भारत देश गतीने विकास करत आहे. स्वच्छ भारत मिशन, जनधन योजना, उज्वला योजना व हर घर जल अभियानाव्दारे गेल्या आठ वर्षात देशाचा सर्वागिण विकास करण्यात येत आहे.


जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ‍ यांच्या हस्ते  कोरोनामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत. अशा 28 बालकांना विविध योजनांचे प्रमाणपत्र व कीट देण्यात आले. पुढील काळात या बालकांच्या सर्वागिण विकासासाठी शासन प्रयत्नशिल आहे. भविष्यात या बालकांना कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी थेट जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकासाठी राबिविण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दस्ताऐवज वितरण व शिष्यवृत्ती वितरण ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली. 

कार्यक्रमाचे आभार जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुवर्णा पवार यांनी मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.