'या' योजनेंतर्गत मिळतेय शेत जमीन, जाणून घ्या पात्रता आणि अटी
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येते. आज आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना 2022 ची माहिती पाहणार आहोत.
किती मिळणार जमीन?
या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजूर कुटूंबाला 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन उपलब्ध करून त्याच्या नावे करून देण्यात येते. तसेच, जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज स्वरूपात तर ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते. सदर योजना ही 2004-2005 पासून राबवण्यात येत आहे.
योजनेच्या अटी
या योजनेसाठी लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा. त्याचे वय 18 ते 60 वर्ष असावे. विधवा किंवा परित्यक्ता स्त्रीयांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे. कर्ज मंजुरी झाल्यानंतर दोन वर्षाने कर्जफेड सुरुवात होणार आहे. कुटुंबाने दिलेल्या कालावधीत कर्जफेड करणे आवश्यक आहे. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र असावे. शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र असणे बंधनकारक आहे. तसेच, खरेदी जमिनीवर लाभार्थ्याने स्वतः लागवड करणे आवश्यक असून याबद्दलचा करारनामा देणे आवश्यक आहे. महसूल व वन विभागाने ज्या व्यक्तीस गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केल्या आहेत, अशा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
वरील सर्व अटी व पात्रता लाभ घेण्यास पात्र असल्यास संबंधित जिल्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा. तसेच, संबंधित योजना ही भूमिहीन शेतमजूरांसाठी हक्काची जमीन मिळावी म्हणून अमलात आणली गेली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.