उत्कृष्ट सेवा देणारा शाखा अभियंता एस. एच. मुजावर
सावर्जनीक बांधकाममध्ये उठवला कामाचा ठसा, ३८ वषार्च्या प्रदीघर् सेवेनंतर आज निवृत्त होणार
सांगली: सांगलीच्या सावर्जनीक बांधकाम विभागात तत्पर आणि उत्कृष्ट सेवा देणारे शाखा अभियंता एस. एच. मुजावर आज ३८ वषार्च्या प्रदीघर् सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या कायर्शऐलीने जिल्ह्यात कामाचा ठसा उमटवला आहे. सिव्हील हॅस्पीटलची नवीन इमारत, अंतगर्त रस्ते, आक्सिजन प्लांट, आयविर्न पुलाजवळील पयार्यी पूल, सांगली-माधवनगर रस्त्यांचे उत्कृष्ट काम त्यांच्या देखरेखेखालीच झाले. सावर्जनीक बांधकाम विभागात कामाची गुणवत्ता टिकवून काम करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता.
आयविर्न पुलाची कालमयार्दा संपल्याने त्याला समांतर पूल उभारण्याचे काम सध्या गतीने सुरू आहे. या पुलाच्या बांधकामाची सुरुवात श्री. मुजावर यांच्या देखरेखेखालीच सुरू झाली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून या पुलाची उभारणी सध्या गतीने सुरू आहे. सांगली-माधवनगर रस्त्याचे रूंदीकरणासह डांबरीकरण त्यांनीच उत्कृष्टरित्या करून घेतले आहे. पेव्हींग ब्लॅकचा स्पीड ब्रेकर ही संकल्पना श्री. मुजावर यांचीच. या स्पीड ब्रेकरमुळे अपघातांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. सांगली सिव्हील हॅस्पिटलची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारतीचे बांधकाम नुकतेच करण्यात आले आहे. या नवीन इमारतीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. सांगली शहराच्या वैभवात भर घालणारी हॅस्पिटलची देखणी इमारत त्यांनी उभी केली आहे. शिवाय कोरोनाकाळात रूग्णांना वरदायी ठरलेला आक्सिजन प्लांट सिव्हीलमध्ये उभारण्यात त्यांचाच पुढाकार होता.
तो प्लांट उभारताना ते स्वतः तेथे हजर होते. सिव्हीलमधील नवीन आयसीयु युनीटही त्यांच्या सूचनेनुसार उभारण्यात आले आहे. घटप्रभा नदीवरील पूल, चंदगड येथील पोलिस वसाहतीचे बांधकाम, विट्यात न्यायालयाची इमारत, विटा शहरातील रस्ते, मालवण येथील किल्ल्यावरील इमारतीची दुरूस्ती, कोरोना काळात क्रीडा संकुलात १३० आक्सिजन बेडचे कामही त्यांच्या मागर्दशर्नाखाली करण्यात आले. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यातील तासगाव, विटा आणि सांगली, सिंधुदुगर् जिल्ह्यातील मालवण येथे सेवा बजावली आहे. त्यांनी जेथे सेवा बजावली तेथे त्यांनी त्यांचा कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांचे बंधू एन. एच. मुजावर एका अग्रीकल्चर कंपनीत नोकरी करत होते. त्यांची नाशिकला बदली झाल्यानंतर त्यांनी शेतीविषयक औषधे तयार करणारी कंपनी सुरू करण्याचा निणर्य घेतला. बंधू एच. एस. मुजावर यांच्या सल्ल्याने भाड्याच्या जागेत नाशिक येथे नॅशनल अग्रो पालिक्लिनीकची उभारणी केली. शेतकऱ्यांच्या बांधापयर्त जाऊन त्यांनी शेती औषधांची माहिती शेतकऱ्यांना दिली. आता त्यांनी स्वतःच्या जागेत भव्य प्लांट उभारला आहे. त्यांच्या कंपनीची औषधे देशभरात वितरित केली जात आहेत. सावर्जनीक बांधकाममध्ये नाव कमावणाऱ्या एस. एच. मुजावर यांच्या पुढील काळासाठी सांगली दपर्ण परिवाराकडून हादिर्क शुभेच्छा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.