आजोबाचा अल्पवयीन नातीवर बलात्कार; शिवाय...
भंडारा : आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना लाखनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आजोबाने असहायतेचा फायदा उचलत आपल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे, या अल्पवयीन नातीवर अजून दोघांनी अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आजोबांसोबत अन्य दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास देवराम तुमसरे, यशवंत तातोबा कमाने, अनिल रमेश सेलोकर असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला असून ती आई आणि आजोबासह राहते. तिच्यावर 2019 पासून हा नराधम आजोबा अत्याचार करत होता. पीडित मुलगी 11 वर्षाची असताना तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार करण्यात आला होता.
2019 मध्ये पीडिता ही एकटीच शेतात गेली असताना तिथे कोणीच नसल्याची संधी साधून आरोपी विलास तुमसरे याने तिला बळजबरीने शेतातील झोपडीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरही धमकी देत तीन वेळा पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला.पोलिसांनी आजोबांसह तिघांविरुद्ध विनयभंग, अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.