तरूणाच्या खूनप्रकरणी पाचजणांना अटक
एलसीबीची कारवाई, पूवीर्चा वाद आणि भुर्जीचे पैसे देण्यावरून कृत्य
सांगली : शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील माऊली अंडा बुजरी चालक संतोष पवार याचा रविवारी रात्री धारदार शस्त्राने खून करण्यात आला. याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने पाचजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व संशयितांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी मृत संतोषचा भाऊ योगेश तुकाराम पवार याने फियार्द दिली आहे.
याप्रकरणी आकाश सचिन शिंदे (वय १९ वर्ष धंदा सेट्रींग रा. ५० फुटी रोड, आजना मस्जीद समोर सांगली), वैभव राजु शिंदे (वय २३ वर्ष रा. जयसींगपुर गल्ली नं. ११ ता. शिरोळ जि. कोल्हापुर), निहाल बशीर नदाफ (बय २३ वर्ष रा. उदगाव पोलीस पाटील गल्ली ता. शिरोळ जि. कोल्हापुर), अकिव सरफराज नदाफ (वय २० वर्ष रा. उदगाव पाटील गल्ली ता. शिरोळ जि. कोल्हापुर), सफवान जमीन बागवान (वय २१ वर्ष रा असी मस्जीद १०० फुटी रोड सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली (एम एच १० डी एस ५२१४) (एम एच ०१ ई एफ ४७५१)
काही महिन्यांपूवीर् मृत संतोष आणि आकाश शिंदे यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग संशयिताना होता. तसेच रविवारी भुर्जीचे पैसे मागितल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर संशयितांनी संतोषच्या गाड्यावरील साहित्य विस्कटले. नंतर आकाश शिंदे याने धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. जखमी अवस्थेत त्याला सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिस संशयितांच्या मागावर होते. खबऱ्याद्वारे संशयित अंकलीतील आदिसागर कायार्लयामागे लपल्याची माहिती मिळाली. नंतर एलसीबीच्या पथकाने तेथे छापा टाकून संशयितांना अटक केली.
सर्व संशयितांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जिल्हा पोलिस प्रमुख दिक्षीत गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार संकेत मगदुम, संदीप पाटील, संदीप गुरव, दिपक गायकवाड, राहुल जाधव, वैभव पाटील, आर्यन देशींगकर, संतोष गळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.