सांगलीत तरूणाचा निघृण खून
रविवारी सायंकाळची घटना, भुजीर्चे पैसे देण्यावरून तिघांचे कृत्य
सांगली : शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील माने चौकातील एका भुजीर् विक्रेत्याचा निघृण खून करण्यात आला. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. संतोष तुकाराम पवार (वय २८, रा. विकास चौक) असे मृताचे नाव आहे. भुजीर्चे बिल देण्यावरून तिघांनी हा हल्ला केला. पोटात वर्मी घाव बसल्याने त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत रात्री उशीरापयर्त विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
संतोष पवार याचा शंभर फुटी रस्त्यावरील माने चौकातील एका पेट्रोल पंपासमोर अंडा भूजीर् विक्रीचा गाडा आहे. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिघेजण दुचाकीवरून त्याच्या गाड्यावर आले. त्यांनी तेथे भुजीर् खाल्ली. त्याचे बिल देण्यावरून तिघांचे संतोषशी वाद झाला. त्यानंतर संशयितांनी धारदार हत्याराने संतोषवर हल्ला केला. त्यात त्याच्या पोटावर वर्मी घाव बसले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. नागरिकांनी तातडीने संतोषला सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रात्री उशीरा उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अजित टिके, विश्रामबागचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.