Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली साठी नविन भव्य महानगरपालिका इमारत तसेच कृषी भवन होणार

सांगली साठी नविन भव्य महानगरपालिका इमारत तसेच कृषी भवन होणार 


कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या पुढाकाराने जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय 


मुंबई दि.२७ : सांगली महानगरपालिकेच्या नविन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाची जवळपास अडीच एकर जागा उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रालयात कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.


सांगली जिल्ह्यातील महानगरपालिका स्थापन होऊन बराच कालावधी होऊनही सुसज्ज अशी इमारत अद्याप झालेली नाव्हती. त्यामुळे प्रशासकीय कामकाजासाठी अडचणी निर्माण होत होत्या, यासाठी जागेची आवश्यकता होती ती उपलब्ध होत नसल्यामुळे इमारत बांधकामासाठी अडचण निर्माण झाली होती. अखेर कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाच्या जागेसाठी सहमती दर्शविली यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेतल्यामुळे सांगली महानगरपालिकेसाठी भव्यदिव्य सुसज्ज अशी महानगरपालिका इमारत होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

 यापुर्वी सांगली जिल्ह्यासाठी डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने भव्य जिल्हा प्रशासकीय इमारत, जिल्हा अधिकारी कार्यालय, न्यायालय इमारत बांधकाम पुर्ण झाले आहे. आता महानगरपालिका इमारत होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासकीय कामकाजासाठी सोयीचे होणार असल्याने जिल्ह्यातील नागरीकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

तसेच सांगली जिल्ह्यासाठी कृषी भवन बांधकामासाठी सर्वसाधारणपणे २५००० ते ३०००० चौरस फुट चे फर्निचर सह बांधकाम महानगरपालिकेच्या माध्यमातून अंदाजे १० कोटी रुपये पर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश यावेळी बैठकीत देण्यात आले. महानगरपालिका मुख्यालय तसेच कृषी भवन इमारत बांधकाम ही दोन्ही कामे समांतर पध्दतीने करण्यात यावीत अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.


 यावेळी या बैठकीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्त, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.