महापालिकाक्षेत्रात रविवारी प्लास्टिक मुक्त अभियान
निसर्ग संवाद आणि वेस्टकार्टकडून संकलन केंद्रे जमा झालेले प्लास्टिक रस्ते कामासाठी वापरले जाणार
सांगली: माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात रविवारी प्लास्टिक संकलन अभियान हाती घेण्यात आले आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
निसर्ग संवाद आणि वेस्ट कार्ट तर्फे सांगली, विश्रामबाग आणि मिरज या तीन केंद्रामध्ये प्लास्टिक मुक्त अभियान दिनांक २९ मे २०२२ रोजी सकाळी ८ ते १० मिरज, ९ ते १२ सांगली आणि ९ ते ११ विश्रामबाग या वेळेत राबविण्यात येत आहे. यासंबंधीत माहिती केंद्र प्रमुखांकडून घेऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवा. या वेळी संकलन केलेले सर्व प्लास्टिक महानगरपालिका रस्ते तयार करण्यासाठी वापर करणार आहे, तरी जास्तीतजास्त नागरिकांनी ह्या उपक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या कडील प्लास्टिक जमा करावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.
सांगलीतील प्लास्टिक संकलन केंद्रे
नंदादीप नेत्रालय, (माधवनगर रोड सांगली) , सावली बेघर निवारा केंद्र, युफोरिया सोसायटी, (बालाजी मिल रोड) , केदार आठवले यांचा वाडा, (सत्तिकर बोळ, गावभाग सांगली) , मानसी क्लिनिक (बापट मळ्याजवळ), मुक्ता फडणीस ( शनिवार पेठ, फडके दत्त मंदिर जवळ, माधवनगर)
विश्रामबाग येथील संकलन केंद्रे
रामसेतू बंगला ( विनया कुलकर्णी, वानलेसवाडी), अनिल रुईकर यांचा बंगला (स्फूर्ती चौक), कृपा हॉस्पिटल (खरे मंगल कार्यालय), पॅटको इंडस्ट्री ( पोलीसमुख्यालयासमोर ) , पितलीया इंडस्ट्रीज ( कुपवाड फाटा) , रवींद्र पाटील यांचे घर ( उत्कर्ष हॉल समोर वारणाली), सिद्धिविनायक पुरम सोसायटी, आनंद चिंतामणी सोसायटी ( धामणी रोड)
मिरज येथील संकलन केंद्रे
शेगुणशी यांचे घर, ब्राम्हणपुरी मिरज, पटवर्धन हॉल, शिवाजीनगर , आदर्श भवन, हिमांशू लेले, आदर्श कॉलनी), माधवी केळकर यांचे घर (रमा उद्यान), रोहित शिंदे यांचे घर (टाकळी रोड मिरज)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.