महापालिकेचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून दीपक चव्हाण यांची निवड
माझी वसुंधरा अभियान ३.० व पॉईंट स्वच्छ सर्वेक्षण २०२३ साठी केली निवड - 5 जून पर्यावरणदिनी होणार सन्मान
सांगली: सामाजिक कार्यकर्ते दीपक भीमराव चव्हाण यांची सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. आज महापालिकेकडून दीपक चव्हाण यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आणि महापालिकेच्या माझी वसुंधरा , स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात सक्रिय सहभाग घेऊन प्रचार प्रसिद्धी केली आहे. याचबरोबर स्वच्छता मोहीम, महापालिकेचे विविध कार्यक्रम, यामध्येही दीपक चव्हाण यांनी विशेष सहभाग दर्शविला होता.
या कामाची दखल घेत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी शोलेस्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक भीमराव चव्हाण यांची सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सन 2022 - 22 या कालावधीसाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली. 5 जून रोजी पर्यावरण दिनी दीपक चव्हाण यांचा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून सत्कार केला जाणार आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांची माझी वसुंधरा अभियान ३.० व पॉईंट स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या वर्षासाठी ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून निवडीबद्दल सत्कार समारंभ रविवार ५ जून २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता , आयएमए हॉल कॅम्पस, आमराई उद्यान जवळ सांगली या ठिकाणी होणार आहे. निवडीबद्दल दीपक चव्हाण यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.