बेकायदेशीर पणे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पानटपऱ्यावर कारवाई करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली दि. 30 : बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई करावी व तंबाखू सेवन दुष्परिणाविषयी जनजागृती, समुपदेशन, शालेय कार्यक्रम तसेच जिल्ह्यामध्ये (कोटपा) सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची प्रथम त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त सपना घुणकीकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे,विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा व कोटपा 2003 कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या अंमलबजावणी बाबतची माहिती घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये किती पानटपऱ्या रजिस्टर आहेत. त्यांची माहिती घेऊन ज्या पानटपऱ्या रजिस्टर नाहीत तसेच ज्या पानटपऱ्यांमध्ये अवैधरित्या तंबाखूची विक्री करण्यात येते अशा पानटपऱ्यांवर कारावाई करण्याबाबत निर्देश देवून कोटपा 2003 कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता येणाऱ्या समस्यांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच 31 मे जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींना तंबाखूसेवन सोडविण्याचा संकल्प करण्याबाबत आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.