प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 30 मे रोजी कोव्हिड 19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना व्हर्चुअल मोडद्वारे संबोधित करणार
सांगली दि. 28 : PM Care For Children योजनेंतर्गत मुलांना देण्यात येणारा लाभ व सेवा तसेच कोविड 19 मुळे अनाथ झालेल्या बालकांचे सर्वोत्कृष्ट हित बालकास 23 वर्षे होईपर्यंत संरक्षित करणेबाबत व्हर्चुअल मोडद्वारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिनांक 30 मे 2022 रोजी संबोधीत करणार आहेत. सदरचा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे सकाळी 9.30 वा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माननीय खासदार, माननीय विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचा दिनांक 30 मे रोजीचा व्हर्चुअल मोडद्वारेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी 9.45 वा. कॉन्फरन्ससाठी मुले लॉगीन होतील. सकाळी 10.30 वा. माननीय प्रधानमंत्री कॉन्फरन्ससाठी लॉगीन होतील, सकाळी 10.31 वा. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री महोदयांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात, सकाळी 10.36 वा. योजनेवरील चित्रपटाचे प्रदर्शन, सकाळी 10.41 वा. योजनेच्या कागदपत्रांचे वितरण, सकाळी 10.45 शाळेत जाणाऱ्या मुलांना शिष्यवृत्तीचे वास्तविक वेळेत हस्तांतरण, सकाळी 10.46 वा. माननीय प्रधानमंत्री यांचे भाषण, सकाळी 11.00 वा. समारंभाची सांगता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.