पॉर्न मूवी दाखवून 'को-ऑपरेशन'ची अपेक्षा करणाऱ्या गणेश आचार्यच्या अडचणीत वाढ
मुंबई : कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर एका महिला को- डान्सरने लैंगिक छळाचा आरोप लावला होता. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गणेश आचार्यविरुद्ध 2020 मध्ये लैंगिक छळ आणि पाठलाग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.मुंबई : कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर एका महिला को- डान्सरने लैंगिक छळाचा आरोप लावला होता. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गणेश आचार्यविरुद्ध 2020 मध्ये लैंगिक छळ आणि पाठलाग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीची चौकशी करणारे ओशिवराचे पोलिस अधिकारी संदीप शिंदे यांनी सांगितले की, नुकतेच अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
कोरिओग्राफरने प्रतिक्रिया दिली नाही
या प्रकरणी गणेश आचार्य यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गणेश आचार्य यांच्यावर त्यांच्या काही सहकाऱ्यांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता, ज्याचा त्यांनी इन्कार केला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये, त्याच्या कायदेशीर टीमने सांगितले की तो मानहानीचा खटला दाखल करेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.