ज्योती आदते यांना आदर्श समाजसेविका पुरस्काराने सन्मानित
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सी टी फाऊंडेशन च्या वतीने संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांना सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदर्श समाजसेविका हा पुरस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी महापौर म्हणाले हा पुरस्कार देताना मला खुप अभिमान वाटतोय कारण आमच्या सहकारी ज्योती आदाटे गेल्या 35 वर्षांपासून अगदी शालेय जीवनापासून चळवळीत सक्रिय आहेत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड संघर्ष करून कोणतीही कौंटुबिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी खर्या अर्थाने शुन्यातून जग निर्माण करुन स्वतः ची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी जे भोगल ते दुसर्याच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी एका मुलीला शैक्षणिक प्रायोजक म्हणून दत्तक घेतले आहे अशा या ज्योती ताई यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत सलग तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागात निवडून येऊन हॅट्रीक नगरसेविका म्हणून मान मिळवला आहे.
15 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा म्हणून ही त्या सक्रिय आहेत. एव्हढेच नाही तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या समितीसोबत त्यांनी अनेक भोंदू बाबांचा पर्दाफाश करुन समाजातील अंधश्रद्धेला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे हे सर्व काम जीवावर उदार होऊन त्या व त्यांची समिती करीत असते अनेक ठिकाणी चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिके सहीत प्रबोधन देऊन जनसामान्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी धडपड करीत असतात.नाट्य व चित्रपट महामंडळावर त्या आजीव सभासद आहेत त्यांनी जवळपास 22 चित्रपटात काम करुन व अनेक नाटकांमधून काम करुन नाट्य व चित्रपट अभिनेत्री म्हणून आपल्या सांस्कृतिक क्षेत्रात ही ठसा उमटविला आहे.विमा क्षेत्रात 25 वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहेत त्यामुळे त्यांना अमेरिकेचा जागतिक पुरस्कार प्राप्त झालेला आहे.संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी वेगवेगळ्या भागात जाऊन महिला मेळावे प्रशिक्षण शिबीरे घेऊन जास्तीत जास्त वंचित घटकांपर्यंत या समितीला नेऊन या समितीला एका उंचीवर नेण्याचे काम केले आहे आणि अविरतपणे कार्यरत आहेत या समितीला त्यांनी अगदीं वारांगना च्या दारातसुध्दा नेले आहे सांगलीच्या इतिहासात कधीच घडले नाही असे कार्य करून दाखवले आहे.
म्हणूनच सामाजिक राजकीय व्यवसायिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात नाव लौकिक मिळविलेल्या ज्योती ताईना हा पुरस्कार देताना अंत्यानंद होतोय. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्योती आदाटें नी सी टी इंडिया फौंडेशनचे त्यांच्या कामाचे कौतुक केले आणी पुरस्कार दिल्याबद्दल आभार मानले तसेच त्या म्हणाल्या की प्रत्येक महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे कारण स्वावलंबनातुनच सबलता येते समाजात आपल्या कार्यातुन खास ओळख निर्माण केली पाहिजे तसेच प्रत्येक महिलेने आपला आत्मसन्मान जपलाच पाहिजे तसेच राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे कारण राजकारणात राहून समाजकारण करता येते याचे ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे असे आपण केले तरच या महिला दिन साजरे करण्याला अर्थ आहे आपल्या मुलींना निर्भयपणे मुलांप्रमाणे ताठ मानेने जगायला शिकवलं पाहिजे असे आवाहन केले यावेळी त्यांच्या सारथी प्रियांका तुपलोंडे यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी सी टी फाऊंडेशनचे मुख्य संपादक गणेश चौधरी मार्गदर्शक अॅड संजय धर्माधिकारी संस्थापक अध्यक्ष तुकाराम सुतार महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वाती शिंदे महिला बाल कल्याण च्या अध्यक्षा गितांजली ढोपे पाटील सांगली अध्यक्षा निता पाटील गिता मुधोळकर इ उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.