3 एप्रिल पासून घरपट्टी पाणीपट्टी एकत्रीकरण प्रक्रियेस सुरवात : एकत्रीकरण प्रक्रिया गतीने पूर्ण करा ; आयुक्त नितीन कापडणीस यांचे विभागांना बैठकीत आदेश
सांगली: पाणीपुरवठा विभागातील गळती आणि तोटा भरून काढण्याच्या दृष्टीने घरपट्टी आणि पाणी बिल एकत्र देण्याबाबत बिल एकत्रीकरण प्रक्रिया गतीने राबवण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी संबंधित विभागाच्या बैठकीत दिले आहेत. याचबरोबर 3 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत एकत्रीकरण प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सूचनाही आयुक्त कापडणीस यांनी बैठकीत केल्या.
महापालिका क्षेत्रात असणाऱ्या घरपट्टी नोंदीच्या तुलनेत पाणी कनेक्शन 47 हजाराने कमी आहेत. त्यामुळे 47 हजार घरानाही पाणीबिले देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यापुढे ज्या मालमत्तेला घरपट्टी आणि त्या मालमत्तेला घरपट्टी आणि पाणी बिल सोबत देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या दालनात घरपट्टी आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस उपायुक्त राहुल रोकडे , उपायुक्त चंद्रकांत आडके, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुनील पाटील, परमेश्वर अलकुडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी 3 एप्रिल पासून घरपट्टी पाणीपट्टी एकत्रीकरण प्रक्रिया सुरू करून 13 एप्रिल पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त कापडणीस यांनी दिल्या. तसेच घरपट्टी पाणीपट्टी एकत्रीकरण करत असताना घरपट्टी मालमत्ता आणि पाणी कनेक्शन यांच्यातील 47 हजार मालमत्तेची तफावत याची माहिती घेऊन त्या तफावत असणाऱ्या मालमत्तांधारकाची माहिती घेऊन त्यांना मालमताना पाणीबिले देण्याबाबत नियोजन करण्याचे आदेशही आयुक्त कापडणीस यांनी दिले. 13 एप्रिलपर्यंत दोन्ही विभागाने एकत्रितपणे बिलांच्या एकत्रीकरनाचा डाटा तयार करावा अशा सूचनाही आयुक्त कापडणीस यांनी दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.