महागाईचा फटका, सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ
नवा महिना सुरू होताच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ केली आहे. मात्र, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या या किमती वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या सिलेंडरची नवी किंमत आता दिल्लीत 2,253 रुपये झाली आहे.
व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 250 रुपयांनी वाढ झाल्यानंतर तोच सिलिंडर आता कोलकात्यात 2,352 रुपये, मुंबईत 2,205 रुपये आणि चेन्नईत 2,406 रुपये झाला आहे. यापूर्वी 1 मार्च 2022 रोजी सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 105 रुपयांनी वाढ केली होती. तर 22 मार्च रोजी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत (स्वयंपाकाच्या गॅसची किंमत) वाढ केली तेव्हा ते 9 रुपयांनी स्वस्त करण्यात आले.
इंधन कंपन्यांनी 1 एप्रिलपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नाहीय. मागील महिन्यात इंधन कंपन्यांनी घरात वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत एकाच वेळी 50 रुपयांनी वाढ केली होती. मात्र या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कोलकातामध्ये 976 रुपये, मुंबईत 949.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 965.50 रुपये झाली आहे. देशातील एलपीजीच्या किमतीचा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जातो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांच्या किमती वेगवेगळ्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.