Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेकडे विविध ना हरकत दाखला, मालमत्ता उतारा आता फक्त ॲानलाईन आणि नागरी सेवा केंद्रातच उपलब्ध! 1 एप्रिलपासून ऑनलाईन अंमलबजावणी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती

महापालिकेकडे विविध ना हरकत दाखला, मालमत्ता उतारा आता फक्त ॲानलाईन आणि नागरी सेवा केंद्रातच उपलब्ध! 1 एप्रिलपासून ऑनलाईन अंमलबजावणी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती


सांगली: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विविध विभागामार्फत दिले जाणारे थकबाकी नसल्याचे दाखले, ना-हरकत दाखले व घरपट्टी विभागाकडील असेसमेंट उतारे हे दि. ०१ एप्रिल, २०२२ पासून ना हरकत दाखला, मालमत्ता उतारा आता फक्त ॲानलाईन आणि नागरी सेवा केंद्रातच उपलब्ध होतील अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.  

अधिक माहिती देताना आयुक्त कापडणीस म्हणाले की, दाखले, उतारे हे महानगरपालिकेच्या  सांगली विभागात घरपट्टी विभाग CFC, मंगलधाम इमारत, पहिला मजला, जिल्हापरिषदेसमोर, सांगली, पाणीपट्टी विभाग CFC, मंगलधाम इमारत, पहिला मजला, जिल्हा परिषदेसमोर, सांगली., प्रभाग समिती क्र. २ चे कार्यालय, विश्रामबाग गणपती मंदिर मागे, सांगली, नागरी सुविधा केंद्र, एल.बी.टी. कार्यालय, जुने स्टेशन रोड, सांगली. मिरज विभाग, मनपा विभागीय कार्यालय येथील CFC, तांदूळ मार्केट, मिरज, पाणीपट्टी विभाग येथील CFC, छ.शिवाजी रोड, मिरज. याचबरोबर कुपवाड विभागात मनपा विभागीय कार्यालय येथील CFC, तांदूळ मार्केट, मिरज याठिकाणी उपलब्ध केले जातील. याशिवाय नागरिकांना आपल्या घरुन, कोणत्याही सायबर कॅफेमधून, महा ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र अथवा नागरी सुविधा केंद्रातून ऑनलाईन प्रिंट काढून घेता येईल. तसेच मनपाच्या संकेत स्थळावरील खालील लिंकवर जाऊन आपल्या मोबाईलद्वारे ही ऑनलाईन दाखले / उतारे प्राप्त करुन घेता येतील.

यापुढे महानगरपालिकेमार्फत थकबाकी नसल्याचे दाखले व असेसमेंट उतारे हे फक्त ऑनलाईनद्वारेच अदा केले जातील व असे दाखले तसेच उतारेच ग्राह्य धरले जातील. नागरिकांनी हस्तलिखीत दाखले / उतारे घेऊ नयेत असे आवाहन मनपा आयुक्त
नितीन कापडणीस यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.