"एकनाथ शिंदे हुशार व्यक्ती, त्यांनाच मुख्यमंत्री करा"
नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर राऊतांनी 'कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता है',असं ट्विट करत खळबळ उडवून दिली.
राऊतांच्या या ट्विटवरून भाजप नेत्यांनी चांगलीच टोलेबाजी केली. तर खासदार नवनीत राणा यांनी देखील राऊतांना टोला लगावला होता. नवनीत राणा यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला. तर राणा यांनी नगरविकास मंत्र्यांबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील सर्वात हुशार व्यक्ती आहेत. मुख्यमंत्र्यांना जर घराबाहेर पडता येत नसेल तर त्यांना मुख्यमंत्री करावं, असं मोठं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.
दरम्यान, खासदारांना जर विचारलं तर त्यांनाही ही आघाडी नको आहे. त्यांना युतीच हवी आहे, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. तर संजय राऊत यांनी कायमचं मौन धारण केलं तर शिवसेनेचंच भलं होईल, असा टोला देखील नवनीत राणा यांनी लगावला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.