किळसवाणा प्रकार; शौचालयात धुतल्या जात आहेत ‘शिवभोजन’ केंद्रातील थाळ्या
यवतमाळ : राज्य सरकारकडून गरजू व्यक्तींना माफक दरांमध्ये चांगले भोजन मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीसंदर्भात एक धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यामधून समोर आला आहे. सर्वांना कमी किंमतीत जेवण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या शिवभोजन थाळीच्या दर्जासंदर्भात शंका उपस्थित करणारा एक व्हिडीओ व्हायरल सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव येथील एका शिवभोजन थाळी केंद्रावरील अस्वच्छता आणि व्यवस्थापनामधील त्रुटी व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. महागाव तालुक्यामधील त्रिमुर्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून नवीन बस स्टॅण्डसमोर लाचवण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रावरील भांडी शौचालयामध्ये धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. जी थाळी या केंद्रात ग्राहकांना दिली जाते, ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिले नेत्याचे हे शिवभोजन थाळी केंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्यामुळे एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडवली जात आहे. आता या शिवभोजन थाळी केंद्र चालकांवर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला असून हा किळसवाणा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.