Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केला सांगली विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा डोंगर

 आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केला सांगली विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा डोंगर


सांगली मंगळवार २९ मार्च २०२२ : आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पर्यंत केलेल्या विकासकामाची माहिती दिली. आता पर्यंत प्राप्त झालेला निधी व झालेली विकास कामे यांची माहिती दिलीच परंतु भविष्यात येणारा निधी व त्याचा विनियोग याचीही माहिती दिली. स्थानिक विकास निधी कोरोना काळात योग्य ठिकाणी वापरून कायमस्वरूपी Oxygen Concentrator Machine, Oxygen Ventilators (Vivo 65) यासारखी महत्वपूर्ण कामे केली.      

आमदार स्थानिक विकास निधी २०१९-२० मध्ये २ कोटी ८५ लक्ष, २०२०-२१ मध्ये स्थानिक विकास निधी ३ कोटी ६ लाख ९६ हजार तसेच २०२१-२२ मध्ये ४ कोटी १८ लाख ४४ हजार कामे सुरु आहेत. अशी एकूण ९ कोटी २६ लाख ३५ हजार एवढ्या निधीतून रस्ते डांबरीकरण व गटर बांधकाम, सामाजिक सभागृह तसेच स्ट्रीट लाईट्सची सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामे करण्यात आली. 

सांगली जिल्ह्यात शहीद स्मारक नसल्यामुळे, माजी सैनिकांच्या मागणीनुसार त्रिकोणी बागेत शहीद स्मारक उभारले आहे. थोड्याच दिवसात त्याचे हि लोकार्पण होईल.  

कोविड काळात पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली (सिव्हील हॉस्पिटल) ला रुग्णवाहिका १७ लाख रु व महानगरपालिका हॉस्पिटलसाठी रुग्णवाहिका १७ लाख निधी उपलब्ध करून दिला. ( ३४ लक्ष )

सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा ऑक्सिजन प्लँट बसविण्यासाठी ९० लक्ष इतका निधी आमदार स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून दिला. Oxygen Ventilators (Vivo 65) साठी २६.५० लाख इतका निधी मंजूर करून दिला. Oxygen Concentrator Machine/N 95 Mask यासाठी ५.०० लाख इतका निधी वापरला. तसेच पी.एम.केअर फंड साठी २ लक्ष व सी.एम.केअर फंड साठी १.०० लाख रु निधी वर्ग  केला. भारतीय जनता पार्टी आपदा कोशास १.०० लाख व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी १.०० लाख निधी वर्ग केला. (१ कोटी २६ लाख ५० हजार )

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) साठी सिटीस्कॅन मशिन खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून १२८ स्लाईस सि टी स्कॅन मशिन विथ ऑल ॲक्सेसरीज अँड टर्न की या ८ कोटी २२ लाख ४० हजार इतक्या किमतीच्या यंत्रसामग्री व साधन सामग्री खरेदी करण्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून प्रशासकीय मान्यतेचा २५ मार्च रोजी शासन निर्णय जारी केला आहे

२५-१५ ग्रामीण विकास योजनेअंतर्गत हरिपूर इनामधामणी, अंकली, बामणोली या गावातील रस्ते विकास कामासाठी १ कोटी इतका निधी मंजूर करून घेतला. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रामध्ये ६० लाख  निधी मंजूर झाला. 

जन्सुविधा योजनेअंतर्गत २०१९-२० मध्ये ७०.०० लाख व २०२०-२१  मध्ये ६०.०० लाख इतका निधी मंजूर झाला. तसेच  २०२१-२२ मध्ये जनसुविधा योजने अंतर्गत विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये गटारी व रस्ते करण्यासाठी ५५.०० लाख निधी मंजुर झाला आहे. ( १ कोटी ८५ लाख )

तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत सन २०१९-२० मध्ये नांद्रे, बुधगाव, पद्माळे, बिसूर, वाजेगाव, या गावांना ३५ लाख मंजूर, २०२१-२२ मध्ये बुधगाव बिसूर या गावांना २० लाख निधी मंजूर करून दिला. (५५ लाख )

 DPDC जिल्हा वार्षीक योजने अंतर्गत २०१९-२० मध्ये ७०.०० लाख मंजूर होऊन तेथील कामे पूर्ण झाली आहेत. सन २०२०-२१ मध्ये नांद्रे ब्रम्हनाळ रस्ता ग्रामा. क्र. ६ ते मौजे डिग्रज रस्ता पाचोरे वस्ती मार्ग या रस्त्यासाठी (१९ लाख) , कुपवाड यशवंत नगर मार्ग ग्रामा क्र. १५ या रस्त्यासाठी (३० लाख), दत्तनगर जाक्वेल ते पद्माळे पाटील वस्ती मार्ग (३० लाख,) वानलेसवाडी हरिजन वस्ती मार्ग – (३० लाख), सांगली फळमार्केट ते सांगली शहर बाहेरील वळण रस्ता रा.मा. क्र. १५४ ते हरिपूर जोड रस्ता (५० लाख), नांद्रे ब्रम्हनाळ रस्ता ग्रामा क्र. ६ किमी १/५०० ते २/०० – (१० लाख,) कुपवाड औद्योगिक वसाहत कवलापूर कानडवाडी रस्ता– (३५ लाख) तासगाव बिसूर रस्ता इजीमा क्र. ९६ किमी ४/५०० ते ८.००–(४० लाख) एकूण (२ कोटी ४४ लाख) रु रकमेची कामे मंजूर होऊन पूर्णत्वास आहेत. तसेच  २०२१ - २२ मध्ये बिसूर तासगाव रस्ता इजीमा ९६ रस्ता सुधारणा करण्यासाठी (५० लाख), नांद्रे बिसूर रस्ता रस्ता ग्रामीण मार्ग २०८ रस्ता सुधारणा-(८५ लाख) विश्रामबाग रेल्वे स्टेशन ते वारणाली मार्ग वसाहत ते कुपवाड वानलेसवाडी ग्रामीण मार्ग ११२ रस्ता सुधारणा – (२५ लाख), कुपवाड ते यशवंत नगर रस्त्यासाठी (३० लाख ). एकूण १ कोटी ९० लाख निधी मंजूर झाला आहे. ( ५ कोटी ४ लाख )

जलजीवन मिशन योजनेमधून मौजे इनामधामनी, जुनी धामणी, पद्माळे या गावांना पाणी पुरवठ्यासाठी पाण्याच्या टाकी, अंतर्गत पाणी पुरवठा करणे व जाकवेल ते पाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन करणे यासाठी निधीची मागणी केली आहे. त्यातील मौजे इनामधामणी साठी २ कोटी ५० लाख रु.चा निधी  मंजूर झाला आहे. 

नाबार्ड २५ व नाबार्ड २७ मधून रामा. क्र १४२ च्या नावरस वाडी ते कर्नाळ रस्त्यावरील लहान पुलासाठी - ५ कोटी २८ लाख ७२ हजार मंजूर झाले. तसेच खोतवाडी गावाजवळ लहान पुलासाठी – १ कोटी ९० लाख रु. (एकूण ७ कोटी १८ लाख ७२ हजार ) 

अर्थसंकल्पीय बजेट २०२०-२१ मध्ये सांगली मिरज रस्ता (जूना हरिपूर रोड कुंभार मळा समता नगर मिरज प्र.जी.मा.क्र. ८५ किमी. रस्त्यासाठी (३ कोटी ४० लाख,) खोतवाडी, बिसूर रस्ता –(२ कोटी,) बुधगाव ते बिसूर रस्ता – (२ कोटी २५ लाख), हरिपूर ते काळी वाट आकाशवाणी रस्ता – (२ कोटी ७५ लाख,) जुनी धामणी ते १०० फुटी रस्ता – (४ कोटी), माधवनगर गावाजवळील रस्ता रुंदीकरण व आर सीसी गटर बांधकाम - (१ कोटी २५ लाख,) इनामधामणी ते फळमार्केट कोल्हापूर रोड पर्यंत व हरिपूर ते अंकली रस्ता सुधारणा – (३ कोटी), माधवनगर कर्नाळ नांद्रे रेल्वे लाईन ते कर्नाळ रेल्वे –(४ कोटी) वसंतदादा कुस्ती केंद्र ते माधवनगर नाका- (३ कोटी) असा एकूण २५ कोटी ६५ लाख निधी मंजूर केला.

अर्थसंकल्पीय बजेट २०२१-२२ सांगली जिल्ह्यातील वसगडे पूल ते नांद्रे आणि कर्नाळ ते म्हसोबा मंदिर (धनंजय गार्डन) ५.०० कोटी, माधवनगर जवळील लहान पुलाच्या  रस्त्या साठी ३.५० कोटी, इनामधामणी ते स्फूर्ती चौक २ कोटी, माधवनगर नाका ते रेल्वे ओवर ब्रिज – २.०० कोटी, सांगली कदमवाडी कसबेडिग्रज रस्त्यासाठी १ कोटी ९० लाख, हनुमान मंदिर ते अहिल्यानगर रस्त्यासाठी ३.०० कोटी एकूण २१ कोटी १२ लाख, ९६ हजार इतका निधी मंजूर झाला आहे. 

सांगली सिव्हील हॉस्पिटलच्या खुल्या जागेत १०० बेड जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम करणे ४५ कोटी ४० लाख तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत माता व बालसंगोपन १०० बेड हॉस्पिटल ३२ कोटी ४५ लाख असे मंजूर केले. (७७ कोटी ८५ लाख ) सागंली सिव्हील हॉस्पिटलच्या खुल्या जागेत मंजूर असलेले मिरज येथे स्थलांतरीत करण्यात आलेले नवजात शिशु रुग्णालय बांधकाम करणे. ४६ कोटी ७४ लाख)  तसेच सांगली  सिव्हील हॉस्पिटल साठी महालॅब महाराष्ट्र शासनाची निशुल्क प्रयोगशाळा मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री, मा. अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. थोड्याच कालावधी मध्ये महालॅब सुरु होईल 

 सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गसाठी २०१७ पासून सातत्याने पाठपुरावा केला असून नुकत्याच सांगली दौर्यावर आलेले मा. नितीनजी गडकरी यांनी पुढील चार महिन्यात पेठ सांगली रस्त्याची निविदा काढून काम सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिले. 

तसेच सांगली विधानसभा क्षेत्रांमधील रेल्वे ओव्हर ब्रिज बाबत मोठी घोषणा केली यामध्ये त्यांनी [1] कर्नाळ रोडवरील रजपूत गार्डन ते माधवनगर जकात नाका रस्त्याच्या रेल्वे फाटक वर रेल्वे ब्रीज करणेसाठी 75 कोटी,[ 2] नांद्रे ते शिरगाव, कवठे, वाजेगावकडे जाणारा रस्ताच्या रेल्वे फाटक वर रेल्वे ओव्हर ब्रिज करणेसाठी तसेच 67 कोटी तसेच [3] जुना बुधगाव रोड वरील शांतिनिकेतन जवळील रस्ताच्या रेल्वे फाटक वर रेल्वे ओव्हर करण्यासाठी 70 कोटी असे एकूण 212 कोटी अंदाजीत रकमेबाबत 3 रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी केंद्रीय  सेतू भारतम योजने अंतर्गत सांगली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याची घोषणा मा नितीन गडकरी यांनी केली. 

पेठ सांगली मिरज 166 एच मधील फेज 2 सांगलीवाडी टोलनाका - बायपास रोड -कॉलेज कॉर्नर -पुष्पराज चौक -विजयनगर चौक - मिरज (राष्ट्रीय महामार्ग १६६), तसेच कॉलेज कॉर्नर - टिंबर एरिया - लक्ष्मी मंदिर - सूतगिरणी - कुपवाड - एम.आय.डी.सी.- सावळी- तानंग फाटा - पंढरपूर रोड (राष्ट्रीय महामार्ग १६६) चा डी.पी.आर.चे काम सुरु असून लवकरात लवकर करून सदर रस्ते नॅशनल हायवे मधून काँक्रिटीकरण करणेबाबत मागणी केली.

 सांगली विश्रामबाग चौक व राजे यशवंतराव होळकर (विजयनगर) चौक येथे उड्डाणपूल करणेबाबत निधीची मागणी केली यावेळी नितीन गडकरी यांनी दिलेल्या पत्राची मागणी पूर्ण करणेसाठी संबंधित विभागास डी.पी.आर. 44 कोटी करण्यासाठी आदेश देऊ असे आश्वासन दिले. एकूण अंदाजित २१० कोटी ९० लाख ९३ हजार मंजूर आहेत.

तसेच ३ रेल्वे ओवर ब्रिज साठी २१२ कोटी व विश्रामबाग चौक व राजे यशवंतराव होळकर (विजयनगर) चौक येथे उड्डाणपूल 44 कोटी असे [ २५६ कोटी ] अंदाजित तसेच राज्यशासन व केंद्र शासना मधून विविध योजनेच्या माध्यमातून सांगली विधानसभा क्षेत्रासाठी निधी मागणी केली असून त्या मंजूर झाल्या कि आपणास कळविण्यात येईल. असे आमदार सुधीरदादा गाडगीळ पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, संघटन सरचिटणीस दीपक माने, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती शिंदे, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेवक संजय यमगर, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, अल्पसंख्याक सरचिटणीस अश्रफ वांकर, आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच अध्यक्ष विश्वजित पाटील, कृष्णा राठोड, राहुल ढोपे, अतुल माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.