युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्षपदी पत्रकार प्रविण मिरजकर यांची बिनविरोध निवड...
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याची शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे बैठक पार पडली. या बैठकीत युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रवीण मिरजकर यांची बिनविरोध निवड झाली. युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
युवा पत्रकार संघाच्या वर्धापदिनानिमित्त विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहे. या संदर्भात शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे बैठक व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या वेळी बोलताना संस्थपाक अध्यक्ष यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व सभासद पदाधिकारी यांना पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवून दिली कोणत्या पद्धतीने कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे याची थोडक्यात रूपरेषा सांगितली राज्यस्तरीय पुरस्कार कोणत्या पद्धतीने कोणत्या व्यक्तींसाठी आसतात या मध्ये काय काम केले पाहिजे, अशा सर्व गोष्टींची माहिती सविस्तर त्यांनी सर्व सभासद पदाधिकारी यांना दिली.
नविन नवोदित पत्रकार यांना मार्गदर्शन केले. पत्रकार संघा मध्ये काम कोणत्या पद्धतीने केले पाहिजे. संघटना कशी चालते अशा अनेक गोष्टंविषयी माहिती त्यांनी दिली.
तसेच युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर महीला जिल्हा अध्यक्षपदी रविना पाटील यांची निवड करून त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्य महीला अध्यक्षा अर्चना चव्हाण व महिला आघाडीच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले..
यावेळी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.