Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'कच्चा बादाम' फेम गायकाच्या नव्या कारचा अपघात, प्रकृती चिंताजनक

 'कच्चा बादाम' फेम गायकाच्या नव्या कारचा अपघात, प्रकृती चिंताजनक


मुंबई : 'कच्चा बादाम' या गाण्याने  गात संपूर्ण जगाला वेड लावलेल्या गायकाचा अपघात  झाला आहे. गायक भुबन बड्याकार  याचा पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये अपघात झाला. ज्यामध्ये तो जबर जखमी झाला असून अपघातानंतर भुबनला तात्काळ रूग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे. भुबनच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. याविषयीचे वृत्त झी मराठीनं दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुबन बड्याकरचा अपघात सोमवारी झाला आहे.

भुबनने नुकतीच एक कार खरेदी केली. भुबन आता कार चालवायला शिकत होता. तेवढ्यातच हा अपघात झाला. अपघातानंतर गायकाला सुपर स्पेशियलिटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भुबन बड्याकर पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणे विकायचं काम करतो. शेंगदाणे विकता विकता तो कच्चा बादाम हे गाणं गात असायचा. सोशल मीडियावर हे गाणं लोकप्रिय होऊन व्हायरल झालं होतं. ज्यानंतर भुबन बड्याकर लोकप्रिय झाला आहे.

भुबन बड्याकर हा मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहेत. दुबराजपूर ब्लॉक अंतर्गत कुरलजुरी गावात त्याचं घर आहे. भुबन याच्या पश्चात पत्नी, २ मुले व १ मुलगी असा परिवार आहे. शेंगदाणे विकून भुबन बड्याकरची २०० ते २५० रुपयांची दिवसाची कमाई होती. पण आता लोकप्रिय झाल्यावर त्याने शेंगदाणे विकणे बंद केले आहे. घरातील तुटलेल्या वस्तूंच्या बदल्यात भुबन शेंगदाणे विकतो हे विशेष. शेंगदाणे विकण्यासाठी तो दूरच्या गावीही जातात. तो दररोज 3-4 किलो शेंगदाणे विकतो आणि 200-250 रुपयांपर्यंत कमाई करतो. मात्र, हे गाणे व्हायरल झाल्यानंतर त्याची कमाई वाढली आहे. त्याने शेंगदाणे विकणे बंद केलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.