राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची अमूल्य भेट ! महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ
मुंबई : केंद्र सरकार पाठोपाठ आता महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट देताना सरकारने तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे. तर, ही वाढ चक्क मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील ११% महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम मार्च, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.तर, राज्य शासकीय कर्मचारी इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.
महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाई भत्ता वाढ १ जुलै, २०२१ पासूनच्या थकबाकीसह मार्च, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात देण्यात आली आहे. १ जुलै, २०२१ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २८ टक्क्यांवरुन ३१ टक्क्यांवर गेला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.