सांगलीत बर्निंग टेम्पो : महापालिका अग्निशमन विभागाने विझवली आग : पेटत्या टेम्पोवर मिळवले नियंत्रण
सांगलीत दुपारी एका आयशर टेम्पोने पेट घेतला. यामध्ये टेम्पोने भीषण रूप धारण केले होते. याची माहिती मिळताच सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत या बर्निंग टेम्पोच्या आगीवर नियंत्रण मिळवले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अग्निशमन विभागाला उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक साधनांमुळे आग विझवण्यास मोठी मदत झाली.
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आपटा पोलीस चौकी नजीक असणाऱ्या आरसीएच ऑफिस बाहेर पाईप घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक नंबर MH १० Z २६१६ ला वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श झाला. यामुळे या टेम्पोच्या मागील भागाला आग लागली. यामध्ये भारत गॅस कंपनीच्या pvc पाईप च्या बंडलने आगीचे रूप धारण केले. बघताच क्षणी आग वाढल्यामुळे याची माहिती मनपा अग्निशमन विभागाला देणेत आली. आग मोठी असल्यामुळे अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी २ बंब आणि ६ जवानांच्या मदतीने धाव घेत या बर्निंग टेम्पोच्या भीषण आगीवर सत्वर नियंत्रण मिळविले. आग इतकी मोठी होती की या आगीत टेम्पोमधील साहित्य जळून खाक झाले.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यानी तातडीने धाव घेऊन भीषण आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.