Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार टेंभु उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार टेंभु उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू


सांगली, दि. 31,  : सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील अनुक्रमे कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, कराड, सांगोला तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या टेंभु उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार टेंभु उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन दि. ३१ मार्च पासून सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

उन्हाळ्याची तीव्रता आणि लाभधारकांची होणारी मागणी लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे. टेंभु बॅरेजचे मुख्य दरवाजे बंद करुन अपेक्षित पाणीसाठा करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने व प्राधान्याने जोड कालवा १ व २ अंतर्गत कडेगाव तालुक्यातील लाभक्षेत्र तसेच टप्पा क्र. ३, ४ व ५ अंतर्गत खानापूर, तासगाव, आटपाडी आणि सांगोला या तालुक्यात तसेच पुणदी विसापूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित केली आहे. साधारणपणे एप्रिल ते जून २०२२ अखेर ६ टीएमसी पाणी उचलण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.