मद्य विक्रेत्यांसमोर राज्य सरकार नरमले, वाढीव परवाना शुल्क दर केले कमी
मुंबई: महाविकास आघाडी सरकारने जानेवारी महिन्यात मद्यविक्री करणाऱ्या परवाना धारकांना मोठा झटका दिला होता. 15 ते 100 टक्के मद्य विक्रेत्याच्या परवाना शुल्कात वाढ करून राज्य सरकारने विक्रेत्यांना मोठा झटका दिला होता. मद्य विक्रेता संघटनांनी त्यानंतर या वाढीव परवाना शुल्क वाढ केल्यामुळे सरकारला न्यायालयात खेचण्याची धमकी मद्याविक्रेत्यांनी दिली होती.कोरोनामुळे आधीच सगळे वाईनबार हे मोठ्या अडचणीत आले आहेत. अनेक जण तर कर्जबाजारी झाले आहे. त्यामुळे उत्पादनशुल्क मंत्री अजित पवार यांच्या सोबत हा विरोध पाहून अखेर बैठक करून वाढलेले दर विक्रेत्यांना न परवडणारे असल्याचे सांगत वाढीव दर कमी करा असा एकसुर आळवल्यानंतर राज्य सरकारने मद्य विक्रेत्याच्या परवाना शुल्काच्या वाढीवमध्ये सुधारणा करून दर कमी केले आहेत. आता परवाना शुल्कमध्ये सरसकट 10 टक्के वाढ केल्याचे राजपत्र द्वारे राज्यातील उत्पादन शुल्क विभागाला या बाबत कळवलं आहे. त्यामुळे मद्य विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पण नुतनीकरण करतांना जनगणना झाल्यानंतर वाढीव दरासाठी विक्रेत्यांना वाढीव परवाना शुल्क भरावा लागणार आहे. करार पत्रक लिहून घेत ही दरवाढ कमी केल्याचे विक्रेत्यांकडून समजते. सध्या 2010 च्या जणगणने नुसार परवाना नूतनीकरण केल्या जात असल्यामुळे येत्या काळात आता कीती दर वाढ होईल ते जनगणनेनंतर कळेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.