महापालिकेत स्व. वसंतदादा पाटील यांना अभिवादन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यानिमित्त स्टेशन चौकातील डॉ. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास आणि त्यानंतर महापालिका मुख्यालयातील प्रतिमेस महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, कमलाकर कुलकर्णी आदींसह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.