तमाशाच्या स्टेजवरून उतरताच माजी सरपंचावर कोयत्याने वार; रुग्णालयात उपचार सुरु
मंचर : वडगाव पीर (ता. आंबेगाव) येथे जुन्या भांडणाचा राग धरून शनिवारी (दि. 26) रात्री 11 वाजता माजी सरपंचांवर कोयत्याने चार वार करण्यात आले. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपीला मंचर पोलिसांनी अटक केली आहे.
माजी सरपंच संजय दिगंबर पोखरकर (वय 49) हे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर भोसरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनीच फिर्याद दिली आहे. संतोष कचरू राजगुडे (रा. वडगाव पीर, ता. आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
वडगाव पीर येथे लोकनाट्य तमाशा सुरू असताना स्टेजवर मान्यवरांचे मानसन्मान करण्यासाठी स्टेजवर गावचे माजी सरपंच पोखरकर तसेच सावळेराम फकिरा आदक, देवराम पंढरीनाथ आदक गेले होते. स्टेजवरील मानसन्मान उरकवुन स्टेजवरुन खाली उरतले. त्यावेळी गावातील संतोष राजगुडेने पूर्वी झालेल्या भांडणाच्या व सामाईक असलेल्या बोअरवेलच्या पाण्याच्या वाटपाच्या कारणावरून राग मनात धरुन लोखंडी कोयत्याने पोखरकर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्याच्या उजव्या कानामागे वार केला. त्यावेळी पोखरकर यांनी मागे वळून पाहिले असता संतोषने दुसरा वार टाळू व कपाळावर केला.
तिसरा वार करत असताना सावळेराम आदक यांनी त्यांचा डावा हातमध्ये घातल्याने त्यांच्या तळहातावर जखम झाली. संतोषने चौथा वार केल्याने पोखरकर यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर जखम झाली, त्याचवेळी जमलेल्या नागरिकांनी राजगुडेला यास पकडले. पुढील तपास पोलिस निरिक्षक सतिश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक उमेश चिकणे करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.