द अम्युचर खो खो असोसिएशन सांगलीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध
द अम्युचर खो खो असोसिएशन सांगलीची सन २०२२-२६ ची चौवार्षिक निवडणूक दि २६/०२/२०२२ रोजी मिरज येथील टॉप इन टाउन हॉटेल मध्ये घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत माननीय ऍड. मयूर लोंढे, सांगली यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले तर महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री सचिन गोडबोले, पुणे हे निवडणूकीसाठी प्रमुख म्हणून उपस्थित होते. द अम्युचर खो खो असोसिएशन सांगलीची ही चौवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. द अम्युचर खो खो असोसिएशन सांगलीची सन २०२२-२६ ची नवनिर्वाचित कार्यकारणी खालील प्रमाणे,
१. डॉ समीर शेख - सांगली - अध्यक्ष
२. श्री गौरव नायकवडी - वाळवा - उपाध्यक्ष
३. डॉ. प्रशांत इनामदार - वसंतनगर - सचिव
४. डॉ अमित राव्हटे - मिरज - खजिनदार
५. श्री किरण मेटकरी - विटा - सहसचिव
सदस्य
६. श्री संजय हिरेकुर्ब - कुपवाड
७. श्री माणिकराव माने - नेर्ले
८. श्री अमजद मुल्ला - नागठाणे
९. श्री विशाल भिंगारदेवे - विटा
१०. श्री मारुती शहापुरे - आष्टा
११. श्री प्रशांत पवार - विटा
१२. श्री समीर माने - भिकवडी बु
१३. श्री विजय माळी - वाळवा
१४. श्री धनाजी माने - केदारवाडी
१५. सौ. धनश्री करमरकर - सांगली
वरीलप्रमाणे सर्वसमावेशक जिल्हा कार्यकारणी झालेबद्दल खो खो क्षेत्रात आणि जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. खो खो खेळासाठी आणि क्रीडांगणावर काम करणारे तरुण पदाधिकारी निवडून आल्याने नवनिर्वाचित कार्यकारणीवर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विशेष बाब:-
व्यवसायाने डॉक्टर असणारे आणि राष्ट्रीय खो खो पटू असणारे अध्यक्ष, सचिव व खजिनदार ही प्रमुख पदे भूषवणारी द अम्युचर खो खो असोसिएशन सांगली ही देशातील पहिली वहिली क्रीडा संघटना ठरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.